इनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली | डॉ.मुर्ताझा अदीब

इनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली | डॉ.मुर्ताझा अदीब

       डॉ.मुर्ताझा अदीब

46 वर्षीय रूग्णावर हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे 8 फेब्रुवारी 2019 : इनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.यामुळे उस्मानाबाद येथील 46 वर्षीय डॉ.दयानंद बाबुराव कावडे यांना वेदनेपासून मुक्तता मिळाली असून ते संपूर्ण हालचालीच्या दिशेने प्रगती करत आहेत. डॉ.दयानंद कावडे यांनी 4 वर्षापूर्वी दुसरीकडे टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली होती परंतु काही वर्षानंतर त्यांना चालताना वेदना जाणवू लागल्या आणि उजव्या पायावर शरीराचा भार टाकणे अशक्य झाले. तसेच संसर्ग झाल्यामुळे ताप देखील येऊ लागला. इनामदार हॉस्पिटल मधील ज्येष्ठ जॉइंट रिप्लेसमेंट शल्यविशारद डॉ.मुर्ताझा अदीब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने गुंतागुतीची व जोखमीची ही शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत केली.

इनामदार हॉस्पिटल मधील ज्येष्ठ जॉइंट रिप्लेसमेंट शल्यविशारद डॉ. मुर्ताझा अदीब म्हणाले की, जेव्हा डॉ. दयानंद बाबुराव कावडे आमच्याकडे आले तेव्हा पृष्ठभागाच्या उजव्या बाजूस होणार्‍या दुखाव्यामुळे त्यांना चालता देखील येत नव्हते. त्यांची अगोदरच अन्य ठिकाणी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली होती ज्यानंतर त्यांना संसर्ग झाला. हिप

रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होणे हे वैद्यकीयदृष्ट्या गुंतागुंतीचे असून या परिस्थितीत जखमेमध्ये किंवा कृत्रिम रोपणाच्या आजुबाजूस संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळेस दोन टप्प्यात शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. या प्रक्रियेदरम्यान पहिल्या टप्प्यात आधीचे रोपण काढून संसर्ग झालेला भाग साफ करणे केला जातो.

पृष्ठभागापासून घेतलेले नमुने आणि अहवाल या दोन्हींच्या अभ्यासानंतर अँटीबायोटिक देण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्याच्या शस्त्रक्रियेनंतर 8 आठवड्यांनी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये पुर्नरोपणाचा समावेश होता.

फिजिशियन डॉ.चोपडावाला आणि भूलतज्ञ डॉ.निखिल हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रियेच्या आधी घेतलेल्या काळजीमुळे गुंतागुंत कमी होण्यास मदत झाली.ही प्रक्रिया चालू असताना इतर वैद्यकीय विभागांशी समन्वय साधणे महत्वाचे असते,कारण पुढच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी संसर्ग गेला आहे का हे पडताळून पाहण्याची गरज असते व त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करता येते.

आता रुग्णाचे स्वास्थ्य सुधारले आहे आणि दोन आठवड्यांत त्यांनी नेहमी सारखे चालणे अपेक्षित आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारामध्ये फिजिओथेरपीचा समावेश आहे जो त्यांना पूर्ववत होण्यास मदत करेल.

डॉ.दयानंद कावडे म्हणाले की, माझ्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाल्यावर 3 वर्षांनी मला नितंबाच्या उजव्या बाजूस परत वेदना जाणवू लागल्या होत्या आणि मला चालणे अशक्य झाले होते. आयुष्यात हालचाल ही फार महत्वाची असते म्हणूनच आत्ता मी खूप खूष आहे आणि याचे श्रेय इनामदार हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला जाते ज्यांच्यामुळे मी आज परत माझ्या पायांवर चालू शकतो आहे.

social position

Share this post